फुटबॉलचा इतिहास

फुटबॉलचा इतिहास

 

फुटबॉल हा अतिशय रोमांचक तसेच कौशल्यपूर्ण खेळ आहे. एका सर्वेनुसार असेच निदर्शनास आले आहे की फुटबॉल हा जगात सर्वात जास्त पसंत केला जाणारा खेळ आहे.

साऱ्या जगभरातील तरुण तसेच कोणत्याही वयोगटातील लोकांचा मनपसंत खेळ हा फुटबॉल आहे फुटबॉल हा खेळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये खेळला जातो. मात्र ब्राझील, स्पेन ,फ्रान्स ,अर्जेंटिना इत्यादी या सर्व देशांमध्ये या खेळात व या खेळाविषयी विशेष आकर्षण दिसून येते.

फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे.मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू टाकेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.

स्कॉटलंडमध्ये चौदाव्या शतकात फुटबॉल या नावाने ओळखला जाणारा खेळ खेळला जात असे. १४२४ मध्ये फुटबॉल कायद्याने ते बेकायदेशीर ठरवले. बंदी त्वरीत रद्द करूनही या खेळाने लोकप्रियता गमावली, आणि केवळ एकोणिसाव्या शतकातच तो पुनर्प्राप्त झाल्याचे दिसून येते.
फुटबॉल हा चिनी खेळ आहे व हा खेळ सुझु या खेळापासून विकसित एक प्रकार आहे.
म्हणजे चीनमध्ये फुटबॉल या खेळाला सुझु या नावाने ओळखले जाते. फुटबॉल या खेळाबद्दल अधिक माहिती पाहायला गेलो तर चीनमध्ये हा खेळ हनुच्या काळामध्ये विकसित करण्यात आला होता.

१५२६ मध्ये इंग्लंडचा राजा हेन्रीआठवा यांनी देखील फुटबॉल खेळण्यांमध्ये रस दाखविला होता व एका खास प्रकारचा बूट बनवून घेतला होता. तसेच सर फिलिप्स सिडनी यांनी १५८० मध्ये एका कवितेच्या माध्यमातून महिला फुटबॉल खेळतानाचे वर्णन केले होते.
१६ व्या शतकाच्या उत्तराधार्थ आणि तसेच सतराव्या शतकाच्या प्रारंभात प्रथमच गोल ही कल्पना विकसित करण्यात आली होती. व याचमुळे फुटबॉल ह्या खेळामध्ये स्पर्धेची भावना निर्माण झाली.खेळाडूने प्रथमच शेताच्या दोन विरुद्ध बाजूस झाले लावून गोलपोस्ट तयार केले.१७ वय शतकामध्ये गोल ची कल्पना विकसित झाल्या नंतर ८ किंवा १२ गोल्स चे सामने खेळले जाऊ लागले.